Advertisement

Responsive Advertisement

सात हजार ६७४ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर -सारथीचे आभार -राजेंद्र दाते पाटील


मुंबई प्रतिनिधी- सारथी संस्थेच्या वतीने या योजनेसाठी २०२१-२२ या साठी सात हजार ६७४ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज कोल्हापूर मधील आहेत. या जिल्ह्यातील दोन हजार ९२५ विद्यार्त्याना  ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
सारथीची ही एक गतीमान कार्यवाही असुन  सारथीचे अध्यक्ष निंबाळकर आणि कार्यकारी संचालक अशोक काकडे यांचे आभार जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले आहे.विविध भागांतील संख्यांचा विचार केल्यास साताऱ्यात एक हजार २०५, नगरमध्ये ७३० जणांना ही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्या खालोखाल सांगलीत ६५९ आणि पुण्यात ४६२ अजांना मंजुरी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातून सात अर्ज आले होते. मात्र, एकही अर्ज मंजूर झालेला नाही. रायगड आणि गडचिरोलीत प्रत्येकी एका विद्यार्थ्यांला  ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. या योजने साठी चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ०७ कोटी ३६ लाख ७०हजार ४०० रुपये निधीचे वाटप झाले आहे.
आमच्या प्रतीनिधी सोबत बातचीत करतांना जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नमुद केलेकी,शिष्यवृत्ती  साठी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत.संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयां पर्यंत असावे आणि या साठी तहसीलदारांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्या साठी नववी आणि अकरावी साठी ५५% गुण, तर दहावीसाठी ६० % गुण अत्यावश्यक आहेत याचे सर्व नियोजन सारथी संस्थेने कार्यकारी संचालक अशोक काकडे यांनी केलेले आहे.
मराठा व कुणबीसमाजातील तरुणांची प्रशासनामध्ये संख्या वाढविण्यासाठी प्रशिक्षण सुरुवात करण्यात आली आहे. मात्र,त्याचा पाया आठवीपासून मजबूत करण्यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी सारथी चे कार्यकारी संचालक अशोक काकडे यांनी मनपुर्वक नियोजन केले असुन राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले या समाजातील असंख्य विद्यार्थी गुणवत्ता यादीत समावेश न झाल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली असुन ही योजना आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याची सारथीचे कार्यकारी संचालक अशोक काकडे यांची योजना भविष्यात अधिक गतीमान व उपयोगी ठरण्यासाठी या योजने साठी शासनाने मजबुत पाठबळ द्यावे अशी आपेक्षा जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या