Advertisement

Responsive Advertisement

ऍड. अशोक पटवर्धन शिवसेनेच्यामराठवाडा विभागीय सचिवपदी नियुक्ती

औरंगाबाद -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी ऍड. अशोक कृष्णाजी पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी त्यांची नियुक्ती बुधवारी जाहीर केली. त्यांच्या निवडीबद्दल मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनीधींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऍड. अशोक पटवर्धन हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ठाकरे परिवारातील विश्वासू सहकारी म्हणून त्यांना शिवसेनेत ओळखले जाते. मराठवाड्यात येणाऱ्या सर्व शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजनाची जबाबदारी ते पुर्वीपासून पार पाडतात. मराठवाड्याचे पहिले सचिव होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. यापुर्वी मराठवाड्यात असे पद देण्यात आले नव्हते. जिल्हा परिषद, मनपा निवडणुकांपुर्वी झालेल्या या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. संघटनात्मक बांधणी व समन्वयासाठी पटवर्धन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिलेल्या संधीचे सोनं करून पक्षवाढीसाठी काम करण्याचा संकल्प पटवर्धन यांनी नियुक्तीप्रसंगी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या