Advertisement

Responsive Advertisement

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत संपन्न

 औरंगाबाद प्रतिनिधी.:-
 पीट अण्ड फिशर सिलंट पायलट प्रोजेक्ट च्या अनुषंगाने दंतविभाग जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे महानगरपालिका शाळा चिकलठाणा येथील विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर  करण्यात आले होते. सदरील शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.एम. मोतीपवळे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पद्मजा सराफ यांनी शालेय विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.
या उपक्रमात वय वर्षे6ते14 विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करुन दातांमध्ये किडरोधक सिमेंट भरण्यात आले.
एकूण65 विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करून 38 विद्यार्थ्यांच्या दातांमध्ये किडरोधक सिमेंट भरण्यात आले. हा उपक्रम जिल्हा रुग्णालय औरंगाबाद व छत्रपती शाहू महाराज दंत रुग्णालय व महाविद्यालय कांचनवाडी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी दंत महाविद्यालयाचे डॉ कुशल शिंदे, डॉ. कुणाल देशमुख, आंतरवासिता डॉक्टर व जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथील डॉ. बाळासाहेब शिंदे,डॉ अनिता खरात, डॉ राहूल दवने, डॉ अमोल काकड, तनवीर शेख, सुषमा आंबुलकर,योगेश सोळूंके, लक्ष्मीकांत माळगे , शुभांगी थोरात, साहेबराव केळोदे, मेघा कोरटकर, शिक्षक व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या