Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल

दौलताबाद प्रतिनिधी -
 अनिता सुधाकर हेकडे वय ४८ वर्ष सरपंच राहणार माळीवाडा  यांनी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे की
ते आपले पती,दोन मुले, सासू सासरे यांच्या सोबत माळीवाडा येथे राहतात 
त्यांचे सासरे देवजी लक्ष्मण यांनी ३५ ते ४० वर्षांपूर्वी माळीवाडा येथील स्वामिल समोर १०३१ स्कोअर फूट जागा घेतलेली असून त्या जागेवर माझ्या पतीने जुने घर पाडून नवीन आर आर सी चे घर बांधले आहे 
 अशोक भानुदास मुळे याने आमच्या घरच्या जागा विरोधात अर्ज दाखल केले होते  दिलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी दि ०६ बुधवार रोजी सकाळी मंडळ अधिकारी व ग्रामसेवक आमच्या घरी आले त्यांनी आम्हाला त्या संदर्भात विचारपूस केली व त्यांनी सदर ठिकाणचा पंचनामा केले व ते निघून गेले त्यानंतर अशोक मुळे आमच्या घरा समोर आला व म्हणाला की मी तुमचे घर तोडल्या शिवाय व तुमचे सरपंच पद काढल्या मी शांत बसणार नाही
यावर मी त्याला सांगितले तुला कायदेशीर काय करायचे ते कर असे समजावून सांगत असताना त्याने वाईट हेतूने माझा उजवा हात धरून जोरात पिरघळून माझ्या मनाला लाज वाटेल असे कृत्य केले त्यामुळे मी ओरडण्याचा एकूण माझी सासू मला सोडवण्यासाठी आल्या त्यांना पण मारहाण केली
हे आवाज ऐकून माझे पती आले व त्यांनी आम्हाला त्याचा तावडीतून सोडले 
यानंतर अशोक मुळे तिथून पळून गेला
अशी तक्रार त्यांनी नोंदवली
दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये अनिता सुधाकर हेकडे यांच्या फिर्यादीवरून ३५४ विनयभंग चा गुन्हा दाखल करण्यात आले आहे
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ हे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या