Advertisement

Responsive Advertisement

भागवत कथा म्हणजे दु:ख नष्ट करणारे अमृत आचार्य शतानंदगिरीजी महाराज याचे प्रतिपादन....

शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर 

संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून विविध धर्मग्रंथांनी मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे प्रतिपादन आचार्य शतानंदगिरीजी महाराज
यांनी भागवत कथा महायज्ञाच्या प्रसंगी केले. 

वैजापुर येथील जिवनंगा येथे रखमाजी बागुल यांच्या संकल्पनेतून सामूहिक संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान महोत्सवास प्रारंभ झाला. कथावाचक प.पु. आचार्य शतानंदगिरीजी महाराज
महाराज यांनी कथा महात्म्याचे वर्णन करताना श्रीमद् भागवत कथा जनहितकारी, कल्याणकारी व सर्वांना योग्य मार्गावर नेणारी असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी श्रीमद् भागवत कथेची शोभायात्रा हनुमान मंदिरापाआसुनभव्य मिरवणूक काढण्यात आली,
टाळ -मृदुगाचा जयघोष, करत देखणे सादरीकरण करताना वेशभूषा परिधान केलेले बालक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तीनामात तल्लीन झालेल्या महिला या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात करण्यात आलेला जयघोष... हे सर्व डोळ्याचे पारणे फेडणारे चित्र होते 
हनुमान मंदिरापाआसुनभव्य मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत आबाल वृद्ध सहभागी झाले होते.हनुमान मंदीररापासून या शोभयात्रेचा प्रारंभ करण्यात आला , दरम्यान जिवनगंगा येथील ग्रामस्थानी घरोघरी गुढी उभारल्या होत्या.
महीला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तीनामात तल्लीन झाल्या होत फुगडीवर ठेका धरला. टाळ म्रुदंगाच्या बोलावर ताल धरत या मिरवणुकीत रंगत आणली .डोक्यावर कलश घेऊन मराठमोळ्या पेहरावात  या शोभायात्रेत सहभागी झाल्या.
भागवत पोथीचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. 

पुढे बोलतांना शतानंदगिरीजी महाराज यांनी भागवत कथेचे महत्त्व आणि मानवी जीवनात त्याचे असलेले महत्त्व विषद करताना भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी आहे.
भगवत म्हणजे भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र, भगवत् तत्त्वाचा निर्देश करणारे शास्त्र.आसुन संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्‍या अमृताचे नाव आहे.अयोध्येचा राजा श्रीराम व द्वारकापती श्रीकृष्णाने भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. राम-कृष्ण नावात भारतीय संस्कृती सामावून गेली आहे. कृष्णाकडे येथे व्यक्ती म्हणून नाही तर प्रतीक म्हणून पाहण्याचा प्रयत्न आहे. 
गोकुळात श्रीकृष्ण जन्म घेत असतो. कृष्णाने नंद-यशोदाच्या पोटी जन्म घेतला.यशोदेचा अर्थ आहे यश देणारी सतवृत्ती. आनंदासाठी व्याकुळ असलेला जीवात्मा व जीवात्म्यास सहायता करणारी सत्प्रवृत्ती यातूनच श्रीकृष्ण जन्म घेत असतो. राम-श्रीकृष्णाच्या जन्माचा शोध घेतल्यास आपणांस खरा अर्थबोध झाल्याशिवाय राहणार नाही. 
सुमधुर आवाजात प पु आचार्य शतानंदगिरीजी महाराज यांनी भागवत कथेप्रसंगी सुमधुर भक्तगीते गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. गायक नंदकुमार शिखरे,पॅड वादक नारायण जाधव,तबला वादक संभाजी डुकरे, म्रुदंग वादक कृष्णा महाराज गायके,सुनिल महाराज औताडे,यांनी गायन वादन करुन साथ दिली.
यावेळेस टाळ -मृदुगाचा जयघोष, करत देखणे सादरीकरण करताना वेशभूषा परिधान केलेले बालक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तीनामात तल्लीन झालेल्या महिला या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात करण्यात आलेला जयघोष... हे सर्व डोळ्याचे पारणे फेडणारे चित्र होते 
हनुमान मंदिरापाआसुनभव्य मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत आबाल वृद्ध सहभागी झाले होते.हनुमान मंदीररापासून या शोभयात्रेचा प्रारंभ करण्यात आला , दरम्यान जिवनगंगा येथील ग्रामस्थानी घरोघरी गुढी उभारल्या होत्या.
महीला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तीनामात तल्लीन झाल्या होत फुगडीवर ठेका धरला. युवक वर्गाने टाळ म्रुदंगाच्या बोलावर ताल धरत या मिरवणुकीत रंगत आणली . डोक्यावर कलश घेऊन मराठमोळ्या पेहरावात  या शोभायात्रेत सहभागी झाल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली या मिरवणुकीत पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होती. 
●●चौकट●●
■ प्रतेक मानुस सप्ताहांताचा अध्यक्ष■
या सप्ताहांमध्ये कुठली कमीटि किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड केलेली नाहित  जनू आपणच सप्ताहांताचा अध्यक्ष समजुन कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता स्वच्छता व ईतर कामे मोठ्या उत्साहाने करतांना दिसत आहे हे विषेश.  

ह्या सप्ताह नियोजनाच्या कामात गावातील सर्व धर्मीय नागरिकांसह आबालवृद्धासह  परीसरातील सर्व नागरिकांची मोलाची साथ आहे ह्या सप्ताह नियोजनाच्या कामात सर्व धर्मीय नागरिकांची मोलाची साथ आसुसून आहोराञ परीश्रम घेत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या