Advertisement

Responsive Advertisement

नांदगाव येथे शाळा पूर्वतयारी मेळावा

वैजापूर-
जि. प. प्रा. शाळा नांदगाव येथे 'स्टार्स प्रकल्पांतर्गत' जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आदेशित शाळा पूर्वतयारी मेळावा दिनांक 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी कुमावत यांनी प्रास्ताविकातून मेळाव्या संदर्भात माहिती दिली. सन -2022-23 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र बालकांची शाळा पूर्वतयारी करून घेण्यात येत आहे. त्यांची पूर्वतयारी म्हणून आदल्या दिवशी गावात दवंडी देण्यात आली. तसेच समाज माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्रवेश पात्र पालक व त्यांचे पालक यांना केंद्रस्थानी ठेवून मेळाव्यामध्ये सात प्रकारचे स्टॉल लावण्यात आली होती 1) नोंदणी स्टॉल 2) शारीरिक विकास 3) बौद्धिक विकास 4) सामाजिक आणि भावनात्मक विकास 5) भाषा विकास स्टॉल 6) गणन पूर्वतयारी स्टॉल 7)पालकांना उपक्रम साहित्य वाटप स्टॉल इत्यादी .सर्व स्टॉल मधून बालकांच्या कृतींच्या नोंदी घेण्यात आल्या. तसेच दुसरा विद्यार्थी स्वागत मेळावा हा 13 जून ला घेण्यात येईल असे सांगितले. यामुळे  बालक , पालक व सर्व गावकर्‍यांमध्ये आनंददायी वातावरण दिसून आले. तसेच शाळेबद्दल  सार्थ अभिमान त्यांच्या कृतीतून दिसून आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका श्रीमती सोनाली कुमावत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विलास त्रिभुवन यांनी मानले या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नवनाथ कोल्हे, नारायण रहाणे, संदीप गायकवाड, किशोर चेंने, गणेश निकम, सांडू भाई शेख, शेषराव निकम, विलास कोल्हे, गणपत निकम,शरद रहाणे,सूनिता राहणे, सुवर्णा कडलक, कविता परिणामे, वैशाली गायकवाड, अनिता गाडे, अरुणा गायकवाड, स्वयंसेवक वैष्णवी निकम, काजल रहाणे, पुजा काळे व सर्व पालक वर्ग यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या