Advertisement

Responsive Advertisement

दोन वर्षानंतर साजरे झाले,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केसापुरीत वार्षिक स्नेहसंमेलन  दौलताबाद- दोन वर्षानंतर स्नेहसंमेलन सारखा विद्यार्थ्यांना आवडणारा,त्यांच्या सुप्तकला गुणांना वाव देणारा कार्यक्रम घेऊन  जि प प्राथमिक शाळा केसापूरी याठिकाणी करण्यात आला.
त्यात भाषण,नाटिका,नृत्य,सिंगल डान्स,ग्रुप डान्स असे विविध पूर्ण कार्यक्रम अगदी आनंदात व उत्साहात पार पडला. त्यात बाळ शिवबा,भीम-गित ,बंजारा गीत,'तेरी मिटी, देश की एकात्मता तर वाकड तिकडं आशया विविध गाण्यावर मुले आनंदाने थिरकली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती मध्ये माजी सैनिक देवचंद जाधव व भारतीय सैनिक राहुल वाहूळ हे होते.या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना उपस्थितांची दाद मिळाली.  प्रास्ताविक मध्ये शाळेचे मुख्याध्यापक रवी जाधव यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गणेश सोनवणे सर यांनी केले.
  या कार्यक्रमास गावचे सरपंच, माजी सरपंच-सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे आजी व माजी अध्यक्ष- उपाध्यक्ष-सर्व सदस्य ,सर्व पालक-वर्ग,समस्त गावकरी,तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी या वार्षिक स्नेहसंमेलन  कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या