Advertisement

Responsive Advertisement

भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची मागणीआयएनएस विक्रांत प्रकरणाची सखोल चौकशी करा

औरंगाबाद:- भाजप नेते किरीट सोमय्या हे उठसुठ महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बेताल आरोप करत आहे. मात्र त्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचविण्यासाठी देशभक्तीच्या नावावर ५८ कोटींचा घोटाळा केला. या कोट्यावधी रूपायांची सखोल चौकशी करा, सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ऍड. अशोक पटवर्धन, अनिल जैस्वाल, अखिल शेख, निलेश सेवेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या