Advertisement

Responsive Advertisement

रामनगर येथे भीमजयंती निमित्त चिमुकल्यांचे वक्तृत्व कार्यक्रम संपन्न....


धर्माबाद -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शहरातील रामनगर भिमजयंती मंडळाच्या वतीने यावेळी वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी चिमुकल्यांनी महामानवाच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकत महामानवास अभिवादन केले.

    यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सहभागी मुलांनी यावेळी महामानवाच्या जिवनपटावर प्रकाश टाकत उपस्थितांची मने जिंकली.
      यावेळी साक्षी ढगे,संजना घाटे,पृथ्वीराज गायकवाड,आर्यन खंडेलोटे,प्रियंका हातोडे, पौर्णिमा गायकवाड, अंजली धावणे, विद्या सोनकांबळे आदींनी आपले विचार मांडले तर ॲड. अजय अवधुते यांनी यावेळी विशेष असे मोलाचे मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन कोमल वाघमारे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुशीला उत्तम ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघमित्र मंडळातील तरुणांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या