Advertisement

Responsive Advertisement

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ


जिल्हा माहिती कार्यालयाचा विशेष उपक्रम

औरंगाबाद- अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करण्यात येते. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन लाभार्थ्यांनी योजनांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
   जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. या व्हॅनला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी समाज कल्याणचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा माहिती अधिकारी   मुकुंद चिलवंत  आदी उपस्थित होते. 
  या चित्ररथावर स्वाधार योजना, रमाई आवास, सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मिनी ट्रक्टर आदि योजनांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच विविध योजनांच्या ऑडिआ  आणि व्हिडीओ जिंगल्स जाहिराती आणि माहिती पत्रिकेव्दारे देखील प्रसिध्द करण्यात येणार आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या