Advertisement

Responsive Advertisement

जीर्ण अवस्थेत असलेल्या जॉगिंग ट्रॅक ची दुरुस्ती लवकरात लवकर करावी -मोहम्मद हिशाम उस्मानी

 औरंगाबाद - शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांना एका पत्राद्वारे मागणी करण्यात आली की सिडको एन - 8, साखरे मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेवर आसपासच्या नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या व जीर्ण अवस्थेत असलेल्या जॉगिंग ट्रॅक ची दुरुस्ती लवकरात लवकर करावी जेणेकरून जास्तीत जास्त जनतेला याचा फायदा घेता येईल व यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पत्रात असा म्हंटले गेले आहे की औरंगाबाद शहरात मनपा प्रशासनाचे मोकळे मैदान ची संख्या खूपच कमी आहे आणि शहरवासीयांचे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे करोना महामारी मध्ये डॉक्टर लोकांना मोकळ्या हवेत श्वास घेण्याचे व व्यायाम करण्याचे सल्ले देतात, यासाठी या मैदानाच्या उपयोग जनतेच्या आरोग्यासाठी खूप जास्त होऊ शकते. प्रशासनाने या मैदानावर या अगोदरच खूप खर्च करून जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे अगदी थोडेच पैसे खर्च करून याची मरम्मत केल्याने हा मैदान तिथले रहिवाशांच्या कामात येऊ शकते. म्हणून मनपा प्रशासनाने याच्यावर त्वरित लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी जेणेकरून या भागाचे रहिवाशांचे आरोग्य चांगले राहील. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या