Advertisement

Responsive Advertisement

मिटमिटातारांगण नगरीत श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

 , औरंगाबाद  -- येथील मिटमिटा कासलीवाल तारांगण सोसायटी  मध्ये पवनपुत्र श्री हनुमानजी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.तारांगण मंदिर जिर्णोद्धार समितीने यासाठी खुप मेहनत घेवून उत्सवाची तयारी  केली आहे.भगव्या पताका आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण परीसर भक्तीमय झाला होता. यावेळी पहाटे सकाळी ५:४५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव महाआरती, सकाळी ७:००ते ९:०० वाजता ह.भ.प.आप्पासाहेब गायके महाराज यांचे मधूर वाणीने सुश्राव्य किर्तन,सकाळी ९:००ते५:०० वाजेपर्यंत दर्शन सोहळा,सायंकाळी ६:०० वाजेपासून महाप्रसाद (भंडारा)चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परीसरातिला हजारो भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर जीर्णोद्धार समितीद्वारे पदाधीकारी भावीक भक्तांची मोठी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या