Advertisement

Responsive Advertisement

ग्राहक उपभोक्ता सरंक्षण समितीच्या मुंबई शहर अध्यक्षपदी सौ.वृंदा कातारे यांची निवडमुंबई- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या व गरीब,गरजू महिलांना सोंदर्य प्रसाधनाचे मोफत शिक्षण देणाऱ्या सौ.वृंदा कातारे यांची ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या मुंबई शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  समितीचे कार्य संपूर्ण भारतभर सुरू असून समितीमध्ये सामील झालेल्या सर्व पदाधिकारी यांना जिल्हा,तालुका व गावपातळीवर कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते.
   जागो ग्राहक जागो ही चळवळ तळागाळातील सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहचली पाहिजे हा समितीचा उद्देश आहे.सरकारी,निमसरकारी व खासगी आस्थपनांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती निर्माण होऊन ग्राहकांचे हीत जोपासले पाहिजे व ग्राहकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे यासाठी समिती अग्रेसर आहे.
   सौ.वृंदा कातारे यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.सौ.वृंदा कातारे यांना राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे व राज्य अध्यक्षा रंजनाताई देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या