Advertisement

Responsive Advertisement

पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

              


·       मेट्रोच्या मार्गिका क्रमांक २- अ आणि ७ चे लोकार्पण

 

            मुंबईदि. १ : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहेअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहेत्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणारअसेही श्री.ठाकरे यांनी आवर्जून सांगितले

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या २- अ या दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गावरील आणि मेट्रो ७ दहिसर ते आरे या दोन मार्गिकांचे उद्घाटन झाले. उदघाटनानंतर संत पायस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

            यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेउद्योग मंत्री सुभाष देसाईपरिवहन मंत्री ॲड. अनिल परबपर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेवस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेखखासदार गजानन किर्तीकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवएमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेमुंबईचा विकास सातत्याने होत आहे. लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र सुविधा वाढवायच्या कशा हे आव्हान आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारचा सामान्य मुंबईकरांना सुविधा देण्याचा निश्चय आहे. कारण मुंबईच्या विकासात खरे योगदान सामान्य मुंबईकरांच्या कष्टाचे आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पूर्ततेसाठीही अनेक मुंबईकरांनी योगदान दिले आहे. त्यामुळे मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांना आहे.

            मुंबईत अनेक विकासप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. मुंबई करांना आनंदाने जगता यावेअसे विकासप्रकल्प प्राधान्याने राबवत आहोत. त्यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंककोस्टल रोडन्हावा शेवा ते शिवडी अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आनंदाने आणि जलद गतीने प्रवास करता येईलअसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पायाभूत विकासासाठी भरीव तरतूद

            राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटाक्षाने लक्ष देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीनं वर्षात यासाठी चार लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            मुंबईचा विकास करणे महाविकास आघाडी सरकारचे ध्येय आहे. मात्र हा विकास करताना मुंबईचे मुंबईपण हरवणार नाहीयांची काळजी घेतली जाणार आहे. मुंबई बरोबरच पुणेठाणेनवी मुंबईनागपूर येथील मेट्रो विकासालाही चालना देणार आहोत. राज्यातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाहीअसे श्री. अजित पवार यांनी सांगितले.

मेट्रोमुळे वाहतूक गतिमान

            नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मुंबईकरांसाठी राज्यशासनाने दिलेली गुढी पाडव्याची भेट असल्याचे सांगितले. मेट्रोमुळे वाहतूक गतिमान व्हायला मदत होईल. एमएमआरडीएने मुंबई विकासाला गतिमान करण्यावर भर दिला आहे. मुंबईच्या विकासाचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नजिकच्या काळात मेट्रोमोनोबेस्ट आणि लोकल यासाठी एकच तिकीट चालू शकेलअशी प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

'मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यावर भर'

            पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्य शासन मुंबईतील नागरिकांचे जीवन सुसह्य (ईज ऑफ लिव्हिंग) कसे होईल यावर भर देत आहेत. यासाठी छोट्या कामात लक्ष घालत आहोत. यामध्ये फुटपाथ सुधारणास्वच्छतापर्यावरण संवर्धन यांचा समावेश आहेअसे सांगितले.

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांचा मेट्रोतून प्रवास

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरे मेट्रो स्थानक येथे मार्गिका क्रमांक सातचे मेट्रो ला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. त्यानंतर आरे ते कुरार आणि परत असा प्रवास केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेउद्योग मंत्री सुभाष देसाईपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेवस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते.

            कार्यक्रमास आमदार कपिल पाटीलविलास पोतनीसरवींद्र वायकरप्रकाश सुर्वेसुनील प्रभूपोलीस आयुक्त संजय पांडेमाजी महानगर आयुक्त आर. ए. राजीव आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त आयुक्त के. एच. गोविंदराज यांनी आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या