Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.

औरंगाबाद - दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे औरंगपुरा चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर  कार्यावर प्रकाश टाकला त्याबाबत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधले. त्यानंतर पक्ष कार्यालय गांधी भवन येथे औरंगाबाद शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागा तर्फे प्राध्यापक सुदाम चींचाने यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व आंबेडकरवादी विचारधारा वर व्याख्याना द्वारे प्रकाश टाकला.
या जयंतीच्या कार्यक्रमांचा निमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश मुखिया,  काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष अरुण शिरसाठ, सिडको हाडको ब्लॉकचे अध्यक्ष किरण पाटील, गुलमंडी ब्लॉकचे अध्यक्ष एकबालसिंग गील, संतोष भिंगारे, संजय वाघमारे, सागर नागरे, रेखा राऊत, सय्यद हमीद, विजय गायकवाड, विशाल बनवाल, मोहित जाधव, प्रकाश वाघमारे, विजया भोसले, रमाकांत गायकवाड, दीक्षा पवार, केशव नानेकर, चक्रधर मगरे, शकुंतला मगरे, मुदस्सर अन्सारी, मयूर साठे, विनोद उंटवाल, योगेश थोरात, रवी लोखंडे, जयपाल दवणे, उत्तम दनके, शीलवंत गोपीनारे, बाबुराव कळस्कर, दर्शन मलके, मंजू लोखंडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या