Advertisement

Responsive Advertisement

सण-उत्सव जल्लोषात साजरे करून औरंगाबादकरानी शांतता, सामाजिक समता व एकात्मतेचे जगाला घडवून दिले दर्शन - खासदार इम्तियाज जलील


पोलिस प्रशासनाच्या उल्लेखनीय कामाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले कौतुक

औरंगाबाद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, रामनवमी, रमझान उपवास, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव औरंगाबादेतील सर्वधर्मीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान करून सण उत्सव जल्लोषात मोठ्या उत्साहात अभूतपूर्व आनंदमय वातावरणात साजरा करून शांतता, सामाजिक समता व एकात्मतेचे जगाला दर्शन घडवून दिल्याबद्दल खासदार इम्तियाज जलील यानी सर्वांचे आभार मानले. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन व उल्लेखनीय कामाचे कौतुक ही केले.
          आपल्या व्हिडिओ संदेश मध्ये खासदार जलील म्हणाले, शहरातील नागरिकांनी ज्याप्रमाणे सण उत्सव  आनंदमय वातावरणात साजरे केले ते देशासह जगभरासाठी एक आदर्श आहे. कोणतीही आपत्तीजनक घटना न घडवता अगदी शांततेत एक दुसऱ्यांना मदत करत सर्वच समाजातील नागरिकांनी आपआपले सण उत्सव साजरे केले, त्याबद्दल औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांचे जितके आभार मानावे तितके कमी आहे अशा शब्दात कौतुक करून आभार मानले. 
          व्हिडिओ संदेश मध्ये पोलिस प्रशासनाचे आभार मानत ते म्हणाले की, या सण उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. कारण सर्व नागरिक आपल्या कुटुंबासोबत सण उत्सव साजरा करत असताना हे सर्व कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत होते.
          जलील म्हणाले, शहरातील नागरिकांनी ज्याप्रमाणे सण उत्सवाच्या या काळात सर्वच धर्मचा आदर ठेवला ते खरंच प्रशंसनीय म्हणावा लागेल. रामनवमीच्या दिवशी घडलेली एक घटनेचा उल्लेख करत  म्हणाले की, ज्याप्रमाणे रामनवमीच्या दिवशी शहरातील एका मस्जिदी समोरून भगवान रामाची मिरवणूक जात असताना डिजे बंद करुन नेण्यात आला तो खरंच संपूर्ण देशासह जगभरासाठी शहरातील नागरिकांनी आदर्श उभा केला आहे. अशीच एक घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी घडली त्याबद्दल ही त्यांनी सर्व आंबेडकरी समाजाचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या