Advertisement

Responsive Advertisement

डॉ. आंबेकर विधि महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात


यशस्वी व्हा, प्रगती करा त्याचबरोबर महाविद्यालयाचे नाव मोठे करा मान्यवरांचे आवाहन

औरंगाबाद : १५ जून १९६८ पासून आतापर्यंत डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यामुळे गेल्या ५४ वर्षाच्या आठवणींनी जागा करण्यासाठी डॉ. आंबेकर विधि महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत यशस्वी व्हा, प्रगती करा त्याचबरोबर महाविद्यालयाचे नाव मोठे करा, असे आवाहन मान्यवरांनी व्यक्त केल्या.
        अतिशय उत्साहात पार पडलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे मित्र मैत्रिणी आले होते. सकाळी १० वाजेपासून मुंबई, पुणे,नागपुर, अमरावती आदींसह सर्वच जिल्हातुन विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक जण शासकीय निमशासकीय आणि आपापल्या क्षेत्रात काम करत आहे. ते सर्व एका छताखाली भेटल्याने आनंद व्यक्त केला.
यावेळी अध्यक्ष संजय भिंगारदेव, सचिव सुधीर महाले, विलास आठवले , 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, जिल्हा न्यायाधीश संघरत्न पठारे, माजी न्यायाधीश  राजेश काळे, ऍड. एस. आर बोधाडे, प्राध्यापक व्ही. एन. पाटील, डॉ. पूर्वा कार्तिक, डॉ. गाथा नेरलेकर, प्रा. प्रफुल तेलगोटे,  प्रा. अण्णा ढवळे, प्रा. किरण भालेराव, प्रा. निलेश सोनवणे, प्रा. पवित्रा बनकर, प्रा. प्रियंका खरात, प्रा. मीरा कोथमबीरे, प्रा. राणी तांदळे, प्रा. पी व्ही साळवे, प्रा. उमेश रूपारेल, प्रा. मोरे, प्रा. मकासरे आदींची उपस्थिती होती. यावेळी मेळाव्यानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेत निरोप घेतला.
या मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे जी. आर. धिवर, प्रदीप साळवे, बी. एस. ढगे, जे. के. जमधडे, सी. एम. दामोदर, एस. बी.पवार आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या