Advertisement

Responsive Advertisement

जि.प. शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.


धर्माबाद- तालुक्यातील मौजे मनुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. सदरील मेळावा हा  केंद्रप्रमुख श्री.कमलाकर सर व गटशिक्षणाधिकारी श्री.गोडबोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.शा.मनुर,ता.धर्माबाद येथे शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.
      त्यानिमित्त शाळेत प्रवेशास पात्र असणाऱ्या मुलांच्या पालकांच्या  गृहभेटी घेऊन व प्रभातफेरीच्या माध्यमातुन जनजागृती करून आयोजित मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले . मेळाव्यात विद्यार्थ्यांची शारीरिक, बौद्धिक क्षमता, सामाजिक ओढ आदी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात तपासण्यात आले. व सुट्याच्या काळात विध्यार्थ्यमध्ये या गोष्टी विकसित करण्यासाठी पालकांना प्रबोधीत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ,ग्राम पंचायत, चे सदस्य व पालकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शवून विध्यार्थ्याचा उत्साह वाढविला. शाळेतील शिक्षक श्री हेंबाडे सर व जेटेवाड मॅडम यांनी आयोहकांचे कौतुक व स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या