Advertisement

Responsive Advertisement

मंत्रालयात मराठा उमेदवारांच्या ऊर्जा विभागातील प्रलंबीत नियुक्ती पत्रा बाबत महत्वाची बैठक संपन्न

मुंबई (प्रतिनिधी )-दि २० एप्रिल २०२२ रोजी मंत्रालया मध्ये ऊर्जा मंत्रालया कडे प्रलंबित असलेल्या निवड झालेल्या मराठा उमेदवारांच्या नियुक्ती पत्राच्या संदर्भात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडलेल्या बैठकीत २०१४ व २०१९ मधील मराठा उमेदवारांच्या प्रलंबीत नियुक्त्या बाबत सविस्तर चर्चा झाली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, युवराज सुर्यवंशी, महेश राणे, प्रशांत भोसले, गणेश कदम आदीचें नावे व स्वाक्षऱ्या निवेदनावर होत्या.
सामान्य प्रशासन विभागाने अभिप्राय मागवत असताना चूकीची मागणी केल्याने अहवाल चुकीचा आलेला आहे.या शिवाय खुल्या प्रवर्गातील भरती (अतिक्रमण) असेल अथवा समांतर आरक्षणच्या अंतर्गत महिला,खेळाडू व माजी सैनिक घटकांच्या वर होणारा अन्याय या बाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासकीय चुकांचा पाढाच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या समोर मांडण्यात आला.
दि.२०/०४/ २०२२ रोजी पार पडलेल्या बैठकीत डॉ. नितीन राऊत, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक लेखी मागणी पत्र सुद्धा देण्यात आले असुन त्यात ऊर्जा विभागातील मराठा समाजाचे ४६९ उमेदवारां पैकी उर्वरीत २९८ उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र देणे आणि ५००० उमेदवारांच्या जागा मधील भरती प्रक्रीया मधील समांतर आरक्षण जागा भरणे आदी मागणी असलेले सविस्तर लेखी पत्रात  इ.एस.बी.सी. वर्गातून निवड झालेल्या सर्वच उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी होऊन त्यांची अंतिम निवड यादी शासनाने निश्चित केली होती.
सदर उमेदवारांना नंतर एस.इ. बी.सी.प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले होते आणि ई. डब्लू. एस.१०% आरक्षणाचा लाभ देण्याचे धोरण शासनाने अवलंब केला होता.
 वरील पैकी ४६९ उमेदवारां पैकी १७१ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असुन उर्वरीत २९८ उमेदवारांना तात्काळ कायम स्वरूपी नियुक्ती पत्र देण्याची आणि २०१९ मधील भरती प्रक्रिया मधील ४६६ 
ई डब्लू एस जागा वगळता ४५३४ पडताळणी झालेल्या शिल्लक जागा पैकी १५००-१६०० जागासाठी  पात्र उमेदवार मिळाले त्या व्यतिरिक्त शिल्लक जागा मधुन समांतर आरक्षणाच्या जागा सुद्धा भरण्यात याव्यात ही मागणी केलेली असुन 
सोबत वरील प्रमाणे यादी सुद्धा देण्यात आली आहे.मराठा क्रांती मोर्चा- महाराष्ट्र च्या वतीने या मागणी पत्रावर राजेंद्र दाते पाटील,युवराज सुर्यवंशी महेश राणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अनेक कायदेशीर सविस्तर मुद्दे या महत्वपुर्ण बैठकीत उपस्थित करून नियुक्तीचा रेटा लावल्या नंतर या बाबत कैबिनेट मध्ये प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन  डॉ.नितीन राऊत ऊर्जा मंत्री यांनी दिले असून कैबिनेट बैठकीत या वर झालेल्या चर्चेची अधिकृत माहिती मिळेल त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल.
 निवड झालेले उमेदवारांचे प्रतिनिधी  २०१४व २०१९  मधील ज्या उमेदवारांना नियुक्ती मिळालेल्या नाहीत अशा उमेदवारांच्या संदर्भात लवकरात लवकर कॅबिनेटच्या समोर प्रस्ताव आणून त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विविध खात्यांचे सचिव, मराठा क्रांती मोर्चाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, महेश राणे, प्रशांत भोसले,युवराज सूर्यवंशी, गणेश कदम व इतर समन्वयक  उपस्थित होते. 
लवकरच उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व सदस्य आणि स्वतः ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यावर योग्य तो मार्ग काढण्याचे मत त्यांनी व्यक्त केले असल्याची माहीती समन्वयक युवराज सुर्यवंशी मुंबई यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या