Advertisement

Responsive Advertisement

मयुरपार्क भागात सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन

शहरातील नवीन वसाहतींचा शिवसेनेमुळेच विकास - शिवसेना नेते चंद्रकांत खैरेऔरंगाबाद :- औरंगाबाद शहर आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. यामुळे सातारा परिसर, चिखलठाण, हर्सूल, पडेगाव आदी भागात रहिवासी मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे अगदी ड्रेनेज, पाणी,रस्ते आदी मूलभूत सुविधांसाठी शिवसेनेने आवाज उठवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व नवीन वसाहतींचा शिवसेनेमुळेच विकास झाल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
शिवशक्ती हौसिंग सोसायटी, भगतसिंगनगर, मयुरपार्क भागात सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
 मनपा व जिल्हाप्रशासन आपआपल्या परीने कामे करत असतात. मात्र स्थानिक अडचणी व समस्या खऱ्या अर्थाने शिवसैनिक सोडवत असतो. मग ते काम विकासाचे असो आरोग्याचे असो पोलीस स्टेशन. या सर्व कामात नागरिक व प्रशासन यांचा दुवा म्हणून ते काम करतो. याप्रसंगी कधीकधी आम्हाला वाद सोडवावे लागतात. पण ते क्षणिक असल्याने नागरीक व प्रशासन सहकार्य करतात, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, युवासेना कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, उपजिल्हाधिकारी नारायण सुरे, माजी नगरसेवक सीताराम सुरे, उपशहर प्रमुख संजय हरणे, करण सुरे,  महिला आघाडीच्या शारदा घुले आदींसह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या