Advertisement

Responsive Advertisement

14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा


  
मुंबई, 07 मे : '14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं तुबलेलं नाहीय पण मनात काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार ,असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.'हल्ली विचारांचे प्रदुषण होतंय कोणीही काहीही बोलत आहेत. विकृत विचार मांडले जात आहे.  राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही, सरकारने चागले काम केले तर सांगणे ही दिलदारी आहे पण आता ती दिसत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.'14 तारखेला माझी सभा आहे,  मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुबलेलं नाहीय पण मनात अनेक काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.हल्ली थापा मारण्याची फार सवय आहे. अच्छे दिन येतील असं म्हटले होते, पण आता वाट बघतोय, अशा थापा चालणार नाहीत. कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत बाकी थापा मारणारे जास्त आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या