Advertisement

Responsive Advertisement

राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 35 उदयोन्मुख तारे सन्मानित


            मुंबई, दि. 4 :- देशामुळे आपण प्रगती करतो तसेच आपल्या योगदानामुळे देश प्रगती करतो. आपण करीत असलेले कार्य देशासाठी करीत आहोत आणि आपण करीत असलेली सेवा ही ईश्वराने दिलेली संधी आहे असे मानून कार्य केले तर त्या कामातून आनंदही  मिळतो व काम अधिक चांगले होते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख व्यक्तींना मंगळवारी (दि. ३) राजभवन येथे 'कमला रायझिंग स्टार्सपुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे हे पुरस्कार देण्यात आले.   

            अभिनेत्री प्राजक्ता माळीनृत्य दिग्दर्शक धर्मेश येलांडेअभिनेते प्रतीक गांधीयुवा गायक अमित त्रिवेदीपत्रकार फेय डिसूझा,फॅशन डिझायनर दिव्या शेठ आदींना 'कमला रायझिंग स्टार्सपुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

            विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत युवक युवतींना सन्मानित केल्याबद्दल राज्यपालांनी गोवानी ट्रस्टचे अभिनंदन केले व सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. ट्रस्टचे संस्थापक रमेश गोवानी व निदर्शना गोवानी यावेळी उपस्थित होते.

            प्रसिद्ध डॉक्टर प्रतित समदानीगायिका अनन्या बिर्लाशेफ रणवीर ब्रारकलाकार डीजे शानअभिनेते राहुल शेट्टीमानव मंगलानीविशाल अग्रवालरोनकनदी संरक्षण कार्यकर्ते ग्यात्सो लेपचामुक्ती मोहनरिद बर्मननिधी भाटियाडॉ जितेंद्र पंड्याअभिनेते आकाश ठोसरवंदना जगवानीटी. कोशीदीक्षांत मेहराशौर्य मेहताअनुजा झवेरीकरण कुंद्रामानसी बागलाडॉ. मीनाक्षी मंदाएकता संधीरलक्ष्मी गोवेकरसौरभ चॅटर्जीरुग्वेद बारगुजेपृथ्वीराज पाटीलअपेक्षा दीक्षितविनायक प्रभू यांना देखील कमला रायझिंग स्टार पुरस्कार देण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या