Advertisement

Responsive Advertisement

मुंबईत 483 किलोग्राम दर्जाहीन पनीर जप्तअन्न व औषध प्रशासन शाखा आणि गुन्हे नियंत्रण शाखा यांची संयुक्त कारवाई


            मुंबईदि. 11 : बृहन्मुंबईअन्न  व औषध प्रशासन शाखेच्या अन्न सुरक्षा अधिकारी आणि गुन्हे नियंत्रण शाखा यांनी संयुक्त कारवाई करत कमी दर्जाचे पनीर जप्त केले. जप्त केलेल्या 483 किलोग्राम पनीरची किंमत 1,00,680/- रुपये एवढी असून संबंधितांविरोधात चेंबूर पोलिसांत ‍फिर्याद देण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

            6 मे रोजी गुन्हे नियंत्रण शाखा पोलीसांना प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनबृहन्मुंबई या कार्यालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 1) मे.डेअरी पंजाबचेंबुर कॉलनीचेंबुर मुंबई, 2) वाहन क्र. एमएच 05 डिके 1059 (मे.यशोदा ओर्गनिक फूड प्रा.ली.बदलापूर ठाणे यांचे वाहन) 3) वाहन क्र. एमएच 04 केएफ 1546 (मे.दिशा डेअरीपिम्प्लास,भिवंडीठाणे यांचे वाहन) या आस्थापनांची तपासणी केली असता तेथे मे.यशोदा ओर्गनिक फूड प्रा. ली.बदलापूर ठाणे व मे. दिशा डेअरीपिम्प्लास,भिवंडीठाणे यांनी उत्पादित केलेला पनीरचा साठा वाहतूक व विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.

            हा साठा कमी दर्जा असल्याच्या संशयावरुन पनीरचे नमुने घेवून उर्वरित 483 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या पनीरचे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तथापिपनीरचे नमुने योग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले. त्यामुळे संबंधित विक्रेतापुरवठादार व उत्पादकाविरुद्ध चेंबुर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. 

            सदरची कारवाई सह आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासनबृहन्मुंबई म.ना.चौधरीव सहायक आयुक्त (अन्न)परिमंडळ ७  रा. दि. पवारयांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारीसु.स.खांडेकरसं.शा.सावंतता.ग.लोखंडेस.दा.तोरणेअन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या