Advertisement

Responsive Advertisement

कृषी पत्रकारितेकरिता विजय चौधरी यांना चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार

खुलताबाद : येथील पत्रकार विजय चौधरी यांनी दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून केलेल्या कृषी पत्रकारितेची दखल म्हणून अप्रतिम मीडियाच्या वतीने  ऍग्री बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या "चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार २०२२" जाहीर झाला आहे. 
मुंबई येथे लवकरच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाणार असून शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ अनिल फळे यांनी दिली. 
सन २०२० - २०२१ या दोन वर्षात पत्रकारितेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील पत्रकारांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ अनिल फळे  यांनी हे पुरस्कार जाहीर केले. राज्यातील पत्रकारांनी केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण आणि वेब संवादातून एखाद्या समस्येवर केलेली मांडणी या निकषांवर पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे डॉ अनिल फळे यांनी सांगितले. 
खुलताबाद येथील विजय चौधरी  यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या तीन दशकापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार विजय चौधरी यांना यापूर्वी कृषी व फलोत्पादन विभाग महाराष्ट्र सरकारतर्फे वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार राज्यपाल सी विद्यासागर राव यांचे हस्ते प्रदान झालेला आहे. चौधरी यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा  मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. विजय चौधरी यांनी कृषी व संलग्न विभागाच्या  प्रचार  व प्रसार यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने यथोचित गौरव केला गेला आहे. चौथास्तंभ पुरस्कारासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या या गौरवाबद्दल खुलताबाद तालुक्यासह संभाजीनगर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विजय चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या