Advertisement

Responsive Advertisement

पुलावरचा जीवघेणा प्रवास झाला सुखाचा .दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात .ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण .


(औरंगाबाद प्रतिनिधी /सुनिल वैद्य )

दोन्ही गावाला जोडणाऱ्या पानवडोद येथील पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे . अनेक वर्षापासून पानवडोदकरांची रास्त मागणी होती . ही मागणी आज पूर्ण होऊन पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे . प्रमोद दौड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सिल्लोड तालुक्यातील पानवडोद खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावांच्या मध्ये जुई नदीवर पुर्वी छोटा पूल होता . पावसाळ्यात थोडा पाऊस झाल्यास नदीला  पाणी आल्यास हा पूल पाण्याखाली बुडून जायचा त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना या पुलावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळणे होते .जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत होता .अनेक वर्षापासून पानवडोदकरांची मागणी होती की या नदीवर मोठा उंच बांधण्यात यावा .याची दखल शिवसेनेचे प्रमोद दौड यांनी घेत रीतसर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करीत पुलाच्या व पुलापासून पानवडोद बुद्रुक बसस्थानकापर्यंत कामास मंजुरी आणण्यात यश मिळाले .पूल व बसस्थानकापर्यंत च्या रस्त्याचे नारळ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फोडण्यात आले .पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होणार आहेत . प्रमोद दौड (महाराज ) ठेकेदार गणेश वाघ , सा.बा. विभागाचे इंजिनियर्स दळवी  यांचा मोलाचा सहभाग लाभला आहे . येत्या काही दिवसातच हा पूल तयार होऊन वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात येणार आहे असे प्रमोद दौड (महाराज ) ठेकेदार गणेश वाघ यांनी  बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या