Advertisement

Responsive Advertisement

सतत संशोधन सुरूच ठेऊन पीकांचे नुकसान होऊ देणार नाही- पंजाब डक


 सिल्लोड -अनेक समश्यामुळे अनेक कारणामुळे शेतकरी तोट्यात शेती करतोय; कोणत्या हंगामात कोणते पिके घ्यावेत काय काय वापरावे नियोजन कसे करावे यासह नैसर्गिक संकटे केव्हा व  कसे येणार याबाबत  सतत संशोधन सुरूच ठेऊन पीकांचे नुकसान होऊ देणार नाही व पर्यायाने शेतकरी आत्महत्या कमी होतील असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाब डक यांनी धानोरा येथे युवाशक्ती मंच वतीने आयोजित 'खरीप हंगाम पूर्व तयारी' कार्यशाळेत केले

यावेळी श्री डक पाटील यांनी खरीप हंगाम हवामान अंदाज;नैसर्गिक संकेतांच्या आधारे पावसाच्या आगमनाची तसेच जाण्याचा अंदाज बांधणे;गारपिटीबद्दल माहिती;वीज पडन्याची कारणे व बचावात्मक उपाय;स्थानिक पिकांबद्दल माहिती;कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढणे;हवामान अंदाज बांधणीबाबतचा त्यांचा स्वतःचा प्रवास आदी बाबत मनोगत व्यक्त केले; यावेळी माजी सभापती
श्री.अशोक दादा गरुड; सामाजिक कार्यकर्ते 
श्री.कृष्णा लहाने;श्री.निलेश मिरकर;श्री.रवींद्र काकडे;शशिकांत काकडे;हरीचंद्र काकडे;कृष्णा मोरे;गणेश पाटील; योगेश दिवटे ; बालयोगी वैजिनाथ महाराज; प्रभाकर  वाघ
 यासह  पंचक्रोशीतील; गावातील आजी माजी सरपंच ;उपसरपंच; ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेरमन व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रम संचलन दिलीप काकडे; प्रास्ताविक प्रवीण वाकेकर तर आभार प्रदर्शन संतोष चाबुकस्वार यांनी केले;कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवाशक्ती मंचचे सदस्य; ग्रामस्थांनी परिश्रम घेतले;

 चौकट --शेतकरी हित लक्षात घेऊन डक पाटील काम करत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने श्री डक यांचा सन्मान करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या