Advertisement

Responsive Advertisement

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ,बोगस डॉक्टर तपासणी मोहीम थंडावली
औरंगाबाद - औरंगाबाद शहरासह  तालुक्यातील ग्रामीण भागात  बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडलेला दिसून येत आहे.  बोगस डॉक्टर तपासणी मोहीम थंडावल्याने पुन्हा जैसे थे हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू झाला असून रूग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरासह तालुक्यात मुन्नाभाई एमबीबीएस म्हणजे बोगस डॉक्टर शोध मोहिम थंडावलेली आहे़ राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कृती कार्यक्रम राबवला होता. मात्र, त्यानंतर ही कारवाई थंडावलेली दिसत आहे.  त्यामुळे  बोगस डॉक्टरांचा वावर थांबलेला दिसत नाही. पश्चिम बंगालमधील काही तरूण शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून आदिवासी भागातील जनतेवर अघोरी, स्टेराँईड व विविध प्रकारच्या इंजेक्शन, सलाईनद्वारे उपचार करीत आहे. रूग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाही, तरी अलोपॅथी औषधोपचार करतात. परिणामी निदान न झाल्याने रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कमी जास्त औषध देवून रूग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत. अशिक्षितांचा गैरफायदा घेत  डॉक्टर बिनधास्तपणे रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. बहुतांश डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारच्या पदव्या नाहीत किंवा काहींकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत. पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार, हे कळताच ह्यमुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून निघून जातात वातावरण शांत झाले की पुन्हा आपला धंदा सुरू करताना दिसतात
बोगस डॉक्टर ग्रामीण भागात तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरात कुठलीही परवानगी न घेता दवाखाने थाटून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही. बोगस डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात. हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही कळत नाही. शिवाय, रुग्णही डॉक्टरच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत. आरोग्य विभागाकडून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येते.  जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून 'बोगस डॉक्टरमुक्त' जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

बोगस डॉक्टरांवर अंकुश आणण्यासाठी ग्रामीण भागात दवाखाना सुरू करण्याची परवानगी देताना ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची शैक्षणिक अर्हता आणि अन्य कागदपत्रे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावीत, अशा स्वरूपाचे पत्र संबंधित यंत्रणांना देने गरजेचे असते मात्र
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे जिल्ह्यात दवाखाने उघडत रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होताना दिसून येत आहे  मात्र, तक्रार आल्यानंतरच आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे पुन्हा एकदा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या