Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबादमध्ये राडा, दोन गटात तुफान हाणामारी, महिला-पुरुष एकमेकांना भिडले

औरंगाबाद : औरंगाबादमधून  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात दोन गटामध्ये जोरदार हाणामारी  झालीय. या हाणामारीत गुडघ्यातून रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या हाणामारीत लाकडी दांड्यांनी देखील मारहाणा करण्यात माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या बजाज नगर परिसरात संबंधित घटना घडली आहे. दोन गटातील महिला आणि पुरुष एकमेकांना भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही गटाकडून एममेकांवर अतिशय निर्घृण हल्ले करण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारी करणारे दोन्ही गट हे एकाच परिसरातील आहेत. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर भीषण हाणामारीत झाले. ही हाणामारी अगदी एकमेकांचा जीव घेईपर्यंत पोहोचली. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत परिसरात नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज बांधता येतोय. संबंधित व्हिडीओ हा अवघ्या काही क्षणांचा आहे. पण अंगाला शहारे आणणारा आणि थरकाप उडवणाराच आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. नागरीक भीतीने जगत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनातून भीती दूर करणं हे पोलिसांपुढील आता मोठं आव्हान आहे.संबंधित घटनेमागे किरकोळ कारण आहे. पण त्या कारणामुळे हाणामारीची ही घटना घडली. या घटनेचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्या व्हिडीओत चार ते पाच तरुण एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. हे दोन्ही गट एकाच परिसरात राहणार किंवा शेजारी म्हटले तरी वावगं ठरणार नाही. किरकोळ कारणावरुन भांडण सुरु झालं होतं. पण त्यानंतर त्याला वेगळं वळण लागलं. दोन्ही बाजूने काही तरुणांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड घेऊन एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये एका व्यक्तीला चार ते पाच जणांनी मिळून मारहाण केली. ही मारहाण इतकी भयानक होती की संबंधित व्यक्ती रक्तबंबाळ झालं. जखमी व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.संबंधित घटना ही प्रचंड भयंकर मानली जात आहे. या घटनेमुळे औरंगाबादच्या वाळूंज औद्योगिक वसाहतीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमधील ही पहिलीच घटना नाही. याआधीदेखील अशाच काहिशा घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता पोलीस काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या