Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे शाही ईदगाह येथे ईद उल फित्र उत्साहात साजरी

दौलताबाद -मुस्लिम समाजातील सर्वात मोठा सण म्हणून ईद साजरी करण्यात येत गेल्या दोन वर्षांपासून कोरोना चे सावट असल्याने ईदगाह येथे न पढता घरीच नमाज पठण करण्यात आली होती
पण यंदा कोरोना चे नियम शिथिल असताना मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली
सकाळी आठ वाजेपासून माळीवाडा येथे असलेल्या ईदगाह कडे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले
ईद ची नमाज जामा मशीद दौलताबाद चे इमाम सैफुदिन यांनी पढवली यानंतर सामूहिक दुवा करण्यात आली
देवाकडे सर्व धर्मीय सलोखा,सर्वांना आरोग्य लाभो,चांगले पाऊस पडो,एकमेकांवर प्रेम असो,अशी दुवा करण्यात आली
ईदगाह बाहेर नमाज पठण करून बाहेर पडणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी व पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ व कर्मचारी यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन गळाभेट घेऊन एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवांनी अक्षय त्रितीया च्या शुभेच्छा दिल्या
यावेळी सरपंच पवन गायकवाड, माजी सरपंच दत्तूपंत सुराशे,रामदास इंगळे,सैय्यद शेरू,सैय्यद हारून,रणजित कांजुने,दीपक घुसळे, सैय्यद लाईक,कल्याण कांजुने,गुलाब बळी,नरेश बळी,शेख लाला, सैय्यद राझिक,सय्यद मतीन,सैय्यद जमील,  बाबासाहेब वरकड आदींची प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या