Advertisement

Responsive Advertisement

न्यायालयीन लढ्या साठीमराठा वकिलांच्या परिषदेत आरक्षणावर सखोल कायदेशीर मंथन

औरंगाबाद प्रतिनिधी- मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकाची तयारी आणि मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसीत समावेशा साठी औरंगाबाद उच्च न्यायालयातील याचिका या विषयावर उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील वकिलांची महत्वपुर्ण मंथन परिषद दि ८ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी कॉलेज एन ६ , आईन्स्टाईन सभागृह औरंगाबाद येथे जोमात पार पडली. 
मराठा समाजातील  वकीलांची मोठया प्रमाणावर वकिलांच्या या भव्य मंथन परिषद उपस्थिती होती.
 त्यात अनेकांनी घटनात्मक व कायदेशीर तरतुदी असलेल्या बाबीवर  सखल मंथन केले.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना आयोजक  विधिज्ञ एस एम पंडीत यांनी आयोजना मागील सविस्तर भुमिका विषद केली आयोजक म्हणुन विधिज्ञ एस एम पंडीतआणि विधिज्ञा अंजली पंडीत यांनी भुमिका पार पाडली तर  संयोजन समितीचे वतीने विधिज्ञ संतोष पाथ्रीकर-अध्यक्ष जिल्हा संघ,विधिज्ञ  विधिज्ञ महेश मुठाळ, विधिज्ञ लक्ष्मण प्रधान,विधिज्ञ साहेबराव सोनवणे, विधिज्ञ योगेश तुपे,विधिज्ञ रणजीत गायकवाड, भगवान दळवी,अविनाश औटे आदींनी संयोजन केले होते.
या मंथन परिषदेचे दिप प्रज्वलन करून जेष्ठ विधिज्ञ विलास धोर्डे पाटील, विजयकुमार सपकाळ, संतोष पाथ्रीकर,निवृत्त न्यायाधीश त्रिंबकराव जाधव व एस एम पंडीत यांनी उदघाटन केले तर अत्यन्त खुमासदार पद्धतीने सूत्रसंचालन प्रा.डॉ.संध्या मोहीते यांनी पार पाडले.
या प्रसंगी उपरोक्त ठरलेल्या विषयावर बोलतांना जेष्ठ विधिज्ञ विलास धोर्डे पाटील जेष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी मराठा समाज आरक्षणास पात्रच असुन आरक्षणा बाबत न्याय मिळण्याची प्रतीक्षा मराठा समाज बाळगून असुन न्याया साठी आक्रोश करीत असल्याचे नमुद केलं.
या मंथन परिषदेत अत्यन्त अभ्यासु असे घटनात्मक तरतुद, केस लॉ आदीवर पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी पुनर्विचार याचीकेवर करून आरक्षणा ची मर्यादा वाढविल्या शिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नसुन लोकसभेत प्रलंबीत असलेले आरक्षण वाढीची शिफारस असलेले बील सर्वच राजकीय पक्षांनी एक पाऊल पूढे टाकत मंजुर करून घटना दुरुस्ती द्वारे न्याय देऊन आरक्षणाची ५०%मर्यादा तात्काळ कशी हटवता येईल यावर सविस्तर विविध न्याय निवाड्याच्या संदर्भाने सादरीकरण केले तर मराठवाड्या तील मराठा समाज आरक्षणात होताच तो अधिकार परत बहाल करावे म्हणुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाकर्ते असुन ही बाब कशी आहे हे मुद्देसूदपणे मांडले.
अनेक जेष्ठ विधिज्ञानी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे न्यायालयीन कामकाजात मराठवाड्यातील आरक्षण याचिकेत मांडणी करण्या साठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले.

विधिज्ञ संतोष पाथ्रीकर-अध्यक्ष जिल्हा वकील संघ,विधिज्ञ महेश मुठाळ, विधिज्ञ लक्ष्मण प्रधान,विधिज्ञ साहेबराव सोनवणे, विधिज्ञ योगेश तुपे,विधिज्ञ रणजीत गायकवाड, भगवान दळवी,अविनाश औटे या सह
वकिलांच्या या मंथन परिषदेस विधिज्ञ  काकासाहेब सुस्ते,विधिज्ञ समाधान वाकोडे,विधिज्ञ गोपाळ खंदारे,विधिज्ञा शिल्पा अवचार विधिज्ञ बाबासाहेब हेकाडे,विधिज्ञ चव्हाण या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार विधिज्ञा अंजली पंडीत यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या