Advertisement

Responsive Advertisement

तीस वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा......


लाडजळगाव  प्रतिनीधी 
शेवगाव तालुक्यातील श्री भगवान विद्यालय बालमटाकळी येथे दिनांक ५/५/२२ रोजी एस एस सी बॅच १९९२/९३च्या बॅचचि  स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी बॅचचे माजी विद्यार्थी पन्नास मुले व मुली हजर होती.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री हुलावळे सर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावणा व्यक्त करताना साश्रुंनी वाट मोकळी करून दिली. अलीम शेख, मैनोद्दीन शेख, शैला बाफना, बंडू भोगले, सुनिता शेळके यांनी शालेय जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला. बोलताना अनेकांचा कंठ दाटून आला होता.माजी विद्यार्थी  मधुकर पाटेकर यांनी स्नेहमेळाव्याचे निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,"आपण शाळेच काही देणे लागतो त्यासाठी आपल्या बॅचच्या वतीने तुम्ही शाळेला योग्य ती मदत करावी असे आवाहन केले असता, बॅचच्या वतीने शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी 25000 रुपयाची मदत केली. या रकमेतून शाळेला दोन हजार लिटरच्या दोन टाक्या व प्लंबींग मटेरियल देण्यात आले. श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रामाणिकपणे काम केले तर आपल्या जीवनात काही कमी पडत नाही . हा मोलाचा संदेश त्यांनी दिला. श्री वेदपाठक सर यांनी उत्तम आरोग्य कसे ठेवावे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. श्री क्षीरसागर सर यांनी सर्व मुलांचे तोंड भरुन कौतुक केले. व भावी जीवनासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. दोन तीन वर्षानंतर का होईना असे मेळावे घेतले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्री मराठे सर यांनी बॅच मधील सर्वांचे मनापासून आभार व ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाला श्री शिंदे सर, श्री मापारे सर, श्री निकाळजे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या