Advertisement

Responsive Advertisement

गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते शिलेगाव सोसायटीच्या प्रचार नारळाचा शुभारंभ


राहुरी : राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिलेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत गंगागिरी ग्रामविकास मंडळाने सरला बेट येथे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते नारळ घेऊन शिलेगाव सोसायटीच्या प्रचार नारळाचा शुभारंभ केला.

याप्रसंगी सरला बेट येथे गंगागिरीजी महाराज यांच्या समाधीस मत पत्रिका व श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिलेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत गंगागिरी ग्रामविकास मंडळाने उभे केलेले उमेदवार संदीप उंडे, मच्छिंद्र देवरे, बाळासाहेब बाबासाहेब म्हसे, बाळासाहेब रामदास म्हसे, भगवंत म्हसे, लिलाबाई म्हसे, डॉ संजय म्हसे, ज्ञानेश्वर म्हसे, सुभद्राबाई खिलारी, विठाबाई तागड, पांडुरंग तागड, डॉ पांडुरंग म्हसे, उत्तम देवरे, प्रभाकर म्हसे, अशोक देवरे, नानासाहेब कोळसे, बाबासाहेब वने, किसन भांड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या