Advertisement

Responsive Advertisement

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे बैठक संपन्न

   औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या निधी बाबत आढावा घेण्यात आला.
  या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र स्तरावरून निधीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
    खासदार इम्तियाज जलील यांनी समांतर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामास गती देऊन विहित कालावधीत  पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली.    
    आमदार हरिभाऊ बागडे आणि अतुल सावे यांनी जिल्ह्यातील शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी पंपांच्या डी पीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने डीपीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीला केली. 
   आमदार हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना ,रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना अंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी या  आर्थिक वर्षात करण्यात यावी अशी मागणी  केली .      
       आमदार श्री बोरनारे यांनी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील लाभापासून वंचित  राहिलेल्या शेतकऱ्यांना  पीक विमा मिळवून द्यावा, विमा कंपनीने शेतकऱ्यांची विम्याच्या फरकाची रक्कम देण्याबाबत  कारवाई करण्याची मागणी केली. वैजापूर तालुक्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या परताव्यासाठी नजीकच्या हवामान अंदाज केंद्राची माहिती आधारभूत मानून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फळपीक विमा मिळणेबाबतची मागणीही यावेळी श्री बोरणारे यांनी केली .
  यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,  खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,  तसेच इतर समिती सदस्य आणि सर्व शासकीय यंत्रणाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या