Advertisement

Responsive Advertisement

परप्रांतीय मजुरांचा पैश्यासाठी गळा चिरून खून करून आरोपी फरार

दौलताबाद -
मुंबई नागपूर महामार्ग वर असलेल्या  करोडी ता,औरंगाबाद येथे गोडावून बांधकामासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या मजुराचा शुक्रवारी मध्यरात्री निर्दयीपणे खून करण्यात आला.
असे की करोडी शिवारातील गट नंबर 111 मध्ये एका नवीन गोडाऊनचे बांधकाम सुरू आहे, या बांधकामावर गुत्तेदारा मार्फत मध्यप्रदेश जिल्हा बडवानी सेंधवा तालुक्यातील केलपानी पाड्यातील येथील मजूर कैलास बियांत सिह निगवाल हा कुटुंबासह आपल्या चार भावासोबत मजुरी काम करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी आले होते, कामाला
शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने त्याला कालच ७० हजार रुपये मजुरी मिळाली होती असल्याचे नातेवाईक यांच्या कडून मिळाली व रात्री सर्व भाऊ व त्यांचे कुटुंबीय जेवण करून झोपले असताना रात्री उशिरा साधारण दीड वाजेच्या सुमारास कैलास चा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर भाऊ झोपेतून उठले असता कुणितरी अज्ञात इसम हा कैलास निगवाल याला चाकूने भोसकत असल्याचे कुटुंबियातील इतर सदस्यांनी बघितले व कैलास याची पत्नी ही त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत, ही घटना बघून इतर भाऊ व त्यांचे कुटुंबीय हादरून गेले व त्यांनी त्या इसमाला पकडायचा प्रयत्न केला परंतु तो मारेकरी सगळ्यांना चाकु दाखवत पळून गेला.
या घटने नंतर कैलासच्या छोट्या भावाने गोडाऊन मालक व ठेकेदार याना फोन करत घटनेची माहिती दिली या नंतर तात्काळ या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली. या नंतर पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ व उपनिरीक्षक दिलीप बचाटे व कर्मचारी यांनी घटनास्थळ घेऊन जखमी अवस्थेत कैलास ला घाटी रुग्णालयात हलविण्यात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले पोलिसांनी परिसरात आरोपीचा माग काढला परंतु रात्रीची वेळ असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला
घटनास्थळी गुन्हा शाखेचे अविनाश आघाव,उपनिरीक्षक कल्याण शेळके,शेख हबीब,नाना पगारे, विजय निकम,दौलताबाद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी बी तडवी,ए एस राठोड शोध घेतला व परिसरातील नातेवाईक व इतर विचारपूस करण्यात आली 
कैलास चा खून हे कदाचित त्याला मिळालेल्या पैश्यावरून झाले असल्याचे दिसून येथे या प्रकरणी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
कैलास याला पत्नी,दोन मुले,व एक मुलगी आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या