Advertisement

Responsive Advertisement

पोलिसाने तरुणाला बदडले व्हिडिओ व्हायरल ,पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली

 औरंगाबाद : गस्तीवर असताना अरेरावी करीत शिवी देणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याने चांगलेच बदडले. ही घटना शहरातील सिटीचौक भागात घडली. मारहाणीची संपूर्ण घटना एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने त्या कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली.सिटीचौक पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले संजय नंद हे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कर्मचऱ्यासह सिटीचौक बाजारपेठेत गस्त घालत असताना काही तरुण वाहतुकीस अडथळा निर्माण करीत हुल्लडबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने नंद यांनी त्यांना मज्जाव केला. मात्र, त्यातील एकाने नंद यांना आईवरून अश्लील शिवी दिली. तसेच काय करायचे करा, असे म्हणत उद्धट उत्तरे देत होता. अनेकवेळा समजावून देखील तरुण ऐकत नसल्याने नंद यांचा पारा चढला. त्यांनी तरुणाची चांगलीच धुलाई केली.ही संपूर्ण घटना बाजारपेठेतील एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हे प्रकरण समोर येताच पोलिस आयुक्तांच्या आदेशाने नंद यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि.२) रोजी संध्याकाळपर्यंत तरुणाकडून कोणतीही तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या