Advertisement

Responsive Advertisement

वैद्यकीय सेवा पुरवण्याकडे पशुवैद्यकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष


राहुरी : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय सेवा पुरवण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी अखिल भारतीय क्रांतीसेनेकडे नागरिकांनी केल्या होत्या. त्याअनुषंगाने प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांच्याकडे निवेदनाद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राण्यांच्या रक्त तपासणी साठी असलेली प्रयोगशाळा बंद पडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे‌ शिर्डी जवळील राहाता या ठिकाणी नागरिकांना रक्त तपासणीसाठी आपले प्राणी घेऊन जावे लागतात. तसेच येथे पशुवैद्यकीय सर्जन उपलब्ध असताना देखील कुत्रा, मांजर या सारख्या प्राण्यांना पिल्लं होऊ नयेत म्हणून नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. परिणामी रस्त्यावरील भटक्या श्वानांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणून त्यांची नसबंदी करणे हे गरजेचे झाले आहे,
असे केल्याने लोकांना होणाऱ्या श्वान दंशाचे प्रमाण व त्यातून होणारा रेबीज हा प्राणघातक आजार ही रोखता येणार आहे.

सांगली, सातारा, पुणे ह्या भागात कुत्र्यांच्या नसबंदी मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यात या बाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे.
तसेच मांजर या प्राण्यांचे देखील प्रजनन 4 महिन्याने होत असते. काही नागरिक मांजरीला पिल्लं झाल्यास रस्त्यावर सोडून देतात, या पिल्लांचे हाल होऊन ते मरण पावतात. म्हणून मांजर या प्राण्याच्या सुद्धा नसबंदी करणे आवश्यक आहेत.

राहुरीमध्ये पूर्णवेळ पशुवैद्यकीय सर्जन उपलब्ध असताना देखील अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नाहीत ही राहुरी तालुक्याची मोठी शोकांतिका आहे. तरी राहुरी येथील या पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रा, मांजर या प्राण्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियाची तसेच रक्त तपासण्याची सोय लवकरात लवकर उपलब्ध करावी. या निवेदनावर प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या