Advertisement

Responsive Advertisement

दरेगाव येथे बुधवारपासून जागृत देवस्थान श्री नृसिंह महाराज संस्थान यात्रेस प्रारंभ..


खुलताबाद--तालुक्यातील दरेगाव येथे दरवर्षी प्रमाणे गावाचे दैवत, जागृत देवस्थान श्री नृसिंह महाराज संस्थान यात्रेस बुधवार  दिनांक 4 में 2022 पासून सुरवात झाली आहे.
       यात्रे निमित्ताने दररोज संध्याकाळी नृसिंह मंदिरासमोर सौ. सुनीताबाई सह संतोषभाऊ कोळी यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ जळगाव , यांच्या वतीने  लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सादर केला जातो, मध्यरात्री देवी देवतांचे सोंग काढली जातात. यात्रेच्या पाचव्या दिवशी नवस केलेल्या मुलांना नाचवले जाते.
गावाच्या यात्रेच्या निमित्ताने गावात पाहुणे मंडळींचे आगमन झालेले असते, अतिशय आनंदाच्या वातावरणात रूढी परंपरेने चालत आलेल्या यात्रेची सांगता श्री नृसिंह महाराज यांचे सोंग काढून केली जाते.या दिवशी सत्यनारायणाची पूजा, अभिषेक घातला जातो. यावर्षी  दिनांक 9 में2022 सोमवार रोजी यात्रेची सांगता होणार आहे, तरी सर्व भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा अशी विनंती नृसिंह महाराज कमिटी तसेच सरपंच व  गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या