Advertisement

Responsive Advertisement

डॉ संध्या मोहिते यांना अप्रतिम मीडिया चा चौथास्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार घोषित .

 औरंगाबाद –  
अप्रतिम मीडिया ‘ च्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिल्या जाणाऱ्या ‘ चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ घोषित करण्यात आलेले आहेत. चौथा स्तंभ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते . २०२० -२०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन , विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते . त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम , द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत , अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ . अनिल फळे , संचालिका सौ . प्रीतम फळे , निमंत्रक सर्वश्री राहुल शिंगवी , रणजीत कक्कड , मानस ठाकूर , जगदीश माने , निशांत फळे यांनी दिली . पत्रकारिता अध्यापन गटातील एकमेव पुरस्कार डॉ संध्या मोहिते यांना त्यांचे विद्यापीठातील पत्रकारिता अध्यापन (दृक- श्राव्य आणि मुद्रित माध्यमातील स्तंभ लेखन ) या कार्याबद्दल घोषित झाला आहे . डॉ.संध्या मोहिते यांची  डॉक्टरेट" एफएम रेडिओ ची हिंदी भाषा जागतिकीकरणात काय भूमिका घेऊन आहे यावर  आहे. 
मुद्रित माध्यमांची भाषा आणि जागतिकीकरण या विषयावर ""पोस्ट डॉक्टरेट" करणाऱ्या  महाराष्ट्रातली पहिली खुल्या वर्गातली उमेदवार आहे.)
मिडिया या विषयावर  ग्रंथ - 1)जनसंचार  माध्यम और भाषा
2)मीडिया ,साहित्य और सामाजिक सरोकार 
3)हिंदी:वैश्विक परिदृश्य 
4)"विचार धन से जीवनक्रांति" हिंदी अनुवाद

तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या चिरकुमार सभा या नभो नाट्याचा मराठी अनुवाद आकाशवाणी च्या सर्वच केंद्रावरून प्रसारित झालेला आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेखन आणि स्तंभ लेखन करू चालू असते.  त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.पुरस्कार विजेत्यांना मुंबई येथे लवकरच होणाऱ्या भव्य वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल,असे अप्रतिम मीडिया चे संचालक अनिल फळे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या