Advertisement

Responsive Advertisement

एम आय एम चे नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत, अनेक धार्मिक स्थळांना भेटी


औरंगाबादः एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी  यांचं औरंगाबादमध्ये कालच आगमन झालं असून आज ते शहरातील विविध धार्मिक स्थळांना ते भेटी दिल्या. अकबरुद्दीन ओवैसी हे तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष असून याच माध्यमातून औरंगाबादमध्ये  एक शाळेची उभारणी करण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आले असून एमआयएमने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. खासदार इम्तियाज जलील  यांनी तर ‘आ रहा हू मै…’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकून ओवैसी यांच्या औरंगाबाद दौऱ्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर शहरात ओवैसी यांच्या दौऱ्याची चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात आली. अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबदमध्ये दाखल झाले  त्यांच्या स्वागताला शेकडो कार्यकर्ते हजर झाले. दुपारी चार वाजता त्यांच्या ट्रस्टच्या शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला

औरंगाबादमध्ये आल्यानंतर अकबरुद्दीन औवैसी यांचं खासदार इम्तियाज जलील यांनी जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी औरंगाबादमधील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की परिसरातील हजरत सय्यद शाह दर्ग्यालाही त्यांनी भेट दिली. या दर्ग्यावर त्यांनी चादरही चढवली. त्यानंतर ते औरंगजेब कबरीलाही भेट दिली. खुलताबाद येथील औरंगजेब कबरीचं दर्शन घेतलं. यापूर्वी त्यांचे बंधू असदुद्दीन ओवैसी यांनीनी या कबरीचं दर्शन घेतलं होतं.
2015 च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी हैदराबादच्या धर्तीवर शहरात भव्य शाळा उभारण्याची घोषणा एमआयएमने केली होती. आज आठ वर्षानंतर या शाळेला मुहूर्त सापडले असून शाळेचं भूमीपूजन आज करण्यात येत आहे. हिमायत बाहेच्या शेजारी असलेल्या दोन एकर जागेवर शाळेच्या पाच मजली इमारतीच्या बांधकामाचं भूमीपूजन करण्यात येईल. नियोजीत शाळेच्या जागेची कालच खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी केली. तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे कालच औरंगाबादेत दाखल झाले असून आज त्यांनी खुलताबाद येथील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या