Advertisement

Responsive Advertisement

राज ठाकरेंच्या सभेचे पुरावे केले गोळा, औरंगाबाद पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष


औरंगाबाद, 05 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या औरंगाबाद येथील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाच्या पोलिसांच्या  तपासाला वेग आला आहे. सभेत केलेल्या वक्तव्याचे पुरावे जमा करण्यात आले आहे. लवकरच साक्षीदारांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर औरंगाबदमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेबाबत गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरी यांनी तपास सुरू केला आहे.पोलिसांनी सभा स्थळाचा पंचनामा केला आहे. सभेच्या भाषणाचे पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. साक्षीदारांचा जबाब उद्या शुक्रवारी नोंदवले जाणार आहे. राज ठाकरे यांना या प्रकरणी लगेच नोटीस द्यायची का नंतर द्यायची हा तपासी अधिकाऱ्याचा तपासावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या