Advertisement

Responsive Advertisement

देवगिरी एक्स्प्रेस मधील जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

दौलताबाद प्रतिनिधी -

दि २२ एप्रिल रोजी रात्री दौलताबाद च्या पुढे असलेल्या पोटूळ येथील रेल्वे चे सिंगल तोडून औरंगाबाद कडून मुंबई कडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस च्या ५ ते ९ डब्यावर दगडफेक करून खिडकीतून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन३५ ग्रॅम ची अडीच लाख रुपये किमतीचे बळजबरीने हिसकावून घेतली
महिला च्या फिर्यादी वरून औरंगाबाद येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग व सुरक्षा बल यांना सूचना दिल्या
लोहमार्ग व सुरक्षा बल आरोपीच्या शोधत लागले आरोपी सराईत असल्याने सर्व प्रयत्न विफल झाले शोधकामी तांत्रिक तपासाचा आधार पण मिळाला नाही
सहायक पोलिस निरीक्षक प्रशांतराव गंभीरराव यांना दि २६ रोजी गुप्त बातमीदार यांच्या कडून माहिती मिळाली
सिडको एन ०७ मध्ये काही इसम सोन्याची चैन विक्री साठी येणार आहे 
माहिती घेतली असता वाळूज गायरान भागात राहणारा कुख्यात आरोपी शिवानंद ठकसेन काळे असल्याचे समजले पोलीस निरीक्षक गंभीर राव यांनी तपासाची चक्रे फिरवली तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदरचा गुन्हा शिवानंद काळे व त्याच्या सहकारी यांनी केले असल्याचे  निष्पन्न झाले
आरोपी हे चालक होते ते नेहमी सावधगिरी बाळगत होते ते सातत्याने लोकेशन बदलत होते 
०१ मे निरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी बाहेर गावी पळून जाण्याचा तयारीत आहे यावरून स्थनीक गुन्हे शाखा रेल्वे पोलीस यांनी सयुक्त पथक ने वाळूज गायरान येथून शीवानांद काळे ताब्यात घेऊन विचारपूस केली त्याने चोरी केलेली सोन्याची चैन ही वरखेड तालुका नेवासा जी अहमदनगर येथे विक्री केली असल्याने कबूल केले
नमूद ठिकाणी जाऊन पोलिसांनी सोन्याची चैन हस्तगत केली आहे
शिवानंद याच्या विरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये खून, जबरी चोरी,दरोडा,अवैध अग्निशस्र बाळगणे,असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहे
आरोपी अटकेनंतर अनेक गुन्हे उघळकीस येऊ शकते असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,उपविभागीय अधिकारी मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश भाले,सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गंभीरराव,सहायक पोलिस निरीक्षक शंकर राठोड,पोलीस अंमलदार प्रमोद जाधव,प्रशांत मंडलकर,सूरज गभने व रेल्वे पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे,सहायक पोलिस निरीक्षक अमोल देशमुख,पोलीस अंमलदार राहुल गायकवाड,सोनाली मुंढे,यांनी केली या कामगिरी बद्दल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना धाडसी कारवाई बद्द्ल पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकास दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या