Advertisement

Responsive Advertisement

सदाशिव फुले यांना चौथास्तंभ राज्यतरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर .....


औरंगाबाद -प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार सदाशिव फुले यांना अप्रतिम मीडियाच्या वतीने बिट जर्णालीझम साठी दिल्या जाणाऱ्या चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार 2022 साठी कृषी वृत्त गटातून पुरसकारासाठी निवड झाली आहे.
2020-2021 या दोन वर्षामंध्ये संबंधित पत्रकाराने केलेली विशेष वृत्तांकन विश्लेषण पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते.गेल्या पाच वर्षातील पत्रकारितेतील सदाशिव फुले यांनी शेतकऱ्यांविषयी चांगल्या प्रकारे लिखाण केले आहे. प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या यशोगाथा पोखरा योजनेसंदर्भात आदिअडचणी विषयी त्यांनी चांगल्या प्रकारे लिखाण केले आहे.त्यानुसार कृषी वृत्त गटातून पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल  फळे, निमंत्रक राहुल शिंदे, रंजीत कक्कड, माणस ठाकुर,जगदीश माने, निशान्त फळे यांनी औरंगाबाद येथे दिली आहे.
या निकषानुसार कृषी वृत्त गटातून सदाशिव फुले यांना हा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या नाईट लाईफ, अंधाराला भेदयचंय रोजच रात्री जगायचंय व पोखरा योजने संदर्भात वृतलेखमालेच्या आधारावर हा पूरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच मुंबई येथे होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे अप्रतिम मीडियाच्या संचालक मंडळाने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या