Advertisement

Responsive Advertisement

उमीद फाउंडेशन ने घेतलाय मुक्या प्राण्यांना जगवण्याचा वसा

ठाणे - लॉककडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील सर्व रस्ते ओस पडलेले होते.खाद्याची दुकाने, हॉटेल आणि नाश्त्याच्या गाड्या बंद असल्यामुळे रस्त्यावर वावरणाऱ्या मुक्या बेवारस प्राण्यांची दयनीय अवस्था होत होती.प्राण्यांची झालेली अवस्था उमीद फाउंडेशन च्या संस्थापिका परी मेहता यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रस्त्यावरच्या बेवारस श्वान व मांजरी यांना खाद्य पुरविण्याचाचा निर्णय घेऊन त्यासाठी एक खास कॅम्प ठाणे येथील दान दात्यांच्या मदतीने उमीद संस्थेने डॉग फूड, कॅट फूड, डॉग बिस्किटे, तांदूळ खरेदी करून ते खाद्य बनविणाऱ्या कंपनीला देण्यात आले व त्यांच्याकडून ते बनवून घेऊन शहरात विविध भागात सकाळच्या वेळेस वितरित केले जात आहे.
प्राण्यांसाठी मुख्यरस्त्यावरील भटक्या श्वानांसाठी डॉग फूड, अंडी- भात, आणि डॉग बिस्किटे देण्यात येतात तर मांजरींना कॅट फूड पुरविला जात असल्याची माहिती उमीद फाऊंडेशनच्या संस्थापिका परी मेहता यांनी दिली.
आजचा काळात माणसे माणसांना विचारत नाही पण समाजात असेही लोक आहेत ते या प्राण्यांना विचारतात ,असाच एक फाउंडेशन आहे ज्याची सुरुवात परी मेहता यांनी सुरू केली आहे तिचं नाव आहे उमीद फाऊंडेशन.मुंबईच्या कानाकोपऱ्या पर्यंत उमीद ने केलेला फूड कॅम्प हा एक अनोखा कॅम्प आहे आज एकूण १०० सिडस मोफत तांदूळ, बिस्किट,कॅट फुड स्नॅक्स फुड पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर पॉट व फूड कंटेनर या सगळ्या वस्तूंचे वाटप केले गेले.कॅम्पला मिळालेला प्रतिसाद हा अवर्णनीय असाच होता.मुक्या प्राण्यांना आपण मदत केली पाहिजे अशी भावना उपस्थित शेकडो नागरिकांनी व्यक्त केली. समाजाने या प्राण्यांवर प्रेम करावे व त्यांना कुठल्याही परिस्थितीत मदत करावी जेणेकरून उमीद फाउंडेशन ला त्याचा हातभार लागेल व अजून जोमाने उमीद फाउंडेशन आपले कार्य संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवले अशी आशा परी मेहता यांनी व्यक्त केली.
या कॅम्पला ठाणे येथील इनरव्हील क्लब चे मोठे योगदान लाभले तसेच अर्चिता मिश्रा, अनिता ठानावाला, श्वेता मिश्रा, हेमा दावडा,हिरल मेस्त्री,तेजस,इम्रान व अनेक सहकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या