Advertisement

Responsive Advertisement

येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकवा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे


 
बीड : - ओबीसी आरक्षणाचा निर्धार केव्हा येउ शकतो आपण गाफिल न रहाता आत्ता पासूनच तयारीला लागावे. आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले  नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत. या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकावयाचा आहे असा निर्धार शिवसेना नेते तथा बीड जिल्ह्याचे संपर्क नेते  चंद्रकांत खैरे यांनी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैकीत केला.
     बीडमध्ये आज रविवारी संपर्क नेते  चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले  होते.आयोजित केलेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संपर्कनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, बीड जिलह्यात शिवसेनेला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. जनता आपल्या पाठिशी आहे. आपण केलेल्या समाजहिताचे मोेल होणर आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी जिवाचे रान करून मैदानात उतरायचे आहे. 
      आजपासूनच मतदारांशी संपर्क वाढवून, प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकावयाचा आहे असा निर्धार व्यक्त करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ मे रोजी मुंबईत तर ८ जून रोजी संभाजीनगरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार आहे. दोन्ही मेळावे भव्यदिव्य होणार आहेत. बीड जिल्ह्यातून पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या मेळाव्यासाठी यायचे आहे असेही खैरे म्हणाले. तत्पूर्वी जिल्ह्राप्रमुख अनिल जगताप, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनीही भाषण केले. 

      यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर,माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,बाळासाहेब पिंगळे, महिला आघाडी जिल्हा संघटक संगीताताई चव्हाण, शिव सहकार सेना जिल्हा संघटक पंकज कुटे, किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, जिल्हा संघटक बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, हनुमान जगताप, गणेश वरेकर, आशिष मस्के, भाऊसाहेब लटपटे, एजाज शेख, बबलू खराडे, जयसिंग चुंगडे, तालुका प्रमुख गोरख सिंघण, किरण चव्हाण, कुमार शेळके, दिलीप गोरे, गंगाधर घुमरे, फारुक पटेल, बाबुशेट लोढा, सुनिल अनभुले, शहरप्रमुख सुनिल सुरवसे, शिणू बेदरे, राजेंद्र राऊत, विनोद मुलुक,रंजीत बनसोडे,विनायक मुळे, संजय उडान,किशोर जगताप,बहिरवाळ सर,आकाश जगताप, रतन गुजर, दीपक काळे, गणेश मस्के, संदीपान बडगे, प्रदिप कोटुळे, जगदीश उबाळे, शुभम धूत, हनुप्रसाद पांडे, साहेबराव पोपले, आकाश ससाणे, मुकुंद भालेकर, चंदू ठोंबरे, करण पिंगळे, अजिंक्य पवळ,फरजना शेख,नंदू येवले,अनिल माने, रामनाथ घोडके, शुभम कतांगळे, रवी वखरे आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या