Advertisement

Responsive Advertisement

श्री संत नामदेव शिंपी सहकार गृहनिर्माण संस्थेची कार्यकारिणी गठित

धर्माबाद:- शहरात १९७२ साली स्थापन करण्यात आलेली गृहनिर्माण संस्था असलेली श्री.संत नामदेव शिंपी सहकार गृहनिर्माण संस्थेची २१ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली होती त्यात श्री कोटुरवार यांच्या नेतृत्वात एकता विकास पॅनल चे सर्वच उमेदवार बहुमताने निवडुन आले होते. त्यानिमित्त 
 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज मंदिर धर्माबाद येथे मा. उपनिबंधक,सहकार धर्माबाद यांच्या
पत्रानुसार संस्थेचे प्रथम सभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस.एन.बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात संस्थेच्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी श्री. रमाकांत लक्ष्मणराव कोटुरवार तर उपाध्यक्ष पदी वारकरी सांप्रदायिकेचे चौपदार गंगाधर कोटुरवार यांची निवड करण्यात आली. यासोबतच इतर पदाधिकऱ्यांचीही निवड यावेळी करण्यात आली असून सर्वांना पुढील कार्यासाठी उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या