Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) चेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक

 
            मुंबई, दि. 10 : नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्की द्वारे आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ला अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले.  
            एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन (विमानचालन) विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.
            शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी "बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर" या श्रेणीतील हा पुरस्कार हैदराबाद येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या