Advertisement

Responsive Advertisement

संपादक शिवराज पाटील गाडीवान यांच्या साप्ताहिक आपलं नांदेडचे सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते प्रकाशन


धर्माबाद;- धर्माबाद येथील पत्रकार शिवराज पाटील गाडीवान यांच्या संकल्पनेतून साप्ताहिक आपलं नांदेड या साप्ताहिकाचा शुभारंभ  धर्माबाद येथे सद्गुरु डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी मठ संस्थान मुखेड यांच्या शुभ हस्ते माहेश्वरीभवन येथील  सभागृहामध्ये करण्यात आला.


साप्ताहिक आपल्या नांदेडच्या प्रकाशन सोहळ्यासाठी धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. कमलकिशोर काकांनी, धर्माबाद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वेणूगोपाल पंडित, निजामाबाद जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस साईनाथ पाटील बासरकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जि पि मिसाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटिवार,धर्माबाद औद्योगिक वसाहतीचे अमिरुद्दिन सेठ, जंगम समाजाचे तालुका अध्यक्ष मन्मथ आप्पा स्वामी, किसान ॲग्रो चे पिराजी पाटील चव्हाण , शिवसेना तालुका संघटक गणेश गिरी, बाजार समितीचे संचालक शिवाभाऊ मोकलीकर, नगरसेवक युनूस खान, बाजार समितीचे संचालक अशोक पाटील वडजे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक आपलं नांदेडचे संपादक शिवराज पाटील गाडीवान यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून साप्ताहिक सुरू करण्याचा उद्देश निस्वार्थ,निष्पक्ष वर्तमान पत्रकारीतेची आपली तळमळ आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केली.
साप्ताहिक आपले नांदेडला शुभेच्छा देण्यासाठी डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी आपल्या आशीर्वाद  शुभेच्छा देत असताना पत्रकारांनी 
वास्तविकतेचे भान ठेवून समाजाचे हित जोपासणारी निष्पक्ष पत्रकारिता करावी आवाहन केले व शिवराज पाटील गाडीवान यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत अनमोल असा पेन त्यांना आशीर्वाद रुपी भेट म्हणून दिला .
 धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर कमलकिशोर काकांणी यांनी पत्रकारीते समोरील आव्हाने या विषयावर भाष्य केले व
व शुभेच्छा दिल्या.
 भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटिवार यांनी शुभेच्छा दिल्या.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद सर, शिवसेनेचे संघटक गणेश गिरी ,आदी मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा आपलं नांदेड साप्ताहिकाला दिल्या. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जि पि मिसाळे,
युवा पत्रकार समितीचे अध्यक्ष भगवान कांबळे, संपादक पत्रकार सेवा संघ चे सतिश पाटील शिंदे , धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर,त्यांच्या सहकाऱ्यांनी संपादक शिवराज पाटील गाडीवान यांचे स्वागत केले.
 कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिवकुमार पाटील सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या