Advertisement

Responsive Advertisement

IIM नोकरी शोधणारे नव्हे देणारे असावेत - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, IIM नागपूरचं उद्घाटन करताना आनंद होतोय. 132 एकरांत कॅम्पस तयार झालंय. शैक्षणिक संस्था फक्त शिक्षण घेण्याची जागा नाही तर, उद्योजक घडवण्याचं आणि रोजगार देण्याचा हा काळ आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रात उद्योगाची मोठी संधी  आहे. IIM नागपूरमधून शिक्षणारे विद्यार्थी नोकरी देणारे असावे? नोकरी शोधणारे नाही, असंही राष्ट्रपती म्हणाले. सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमित त्यांना ही खरी श्रद्धांजली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. कॅम्पसमध्ये या भागातील इतिहास आणि माहिती पोर्टेट करण्यात आलीय. बाबासाहेब आंबेडकर  यांनी याच नागपूरच्या भूमित सामाजिक क्रांतीची बीज रोवलीत. नागपूर झिरो माईल आहे, असं राष्ट्रपती म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या