Advertisement

Responsive Advertisement

शिंदे गटात येण्यासाठी तब्बल 50 कोटींची ऑफर - आ उदयसिंह राजपूतऔरंगाबाद - शिंदे गटात सामिल होण्यासाठी ५० कोटींहून अधिकची ऑफर दिली असल्याचा गौफ्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. याशिवाय दोन चारचाकी वरुन फुटेज असल्याचा दावा आमदार राजपूत यांनी केला आहे. १०० कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधातील बंडाला नवे वळण मिळणार असल्याची चर्चा आहे.शिवसेनेतून बंडखोरी करण्यासाठी ५० कोटीहून अधिकची ऑफर होती, असा दाना त्यांनी केला आहे. या ऑफरसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, याहून अधिकची ऑफर होती. याबाबत माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मी गद्दारी केली आहे. १०० कोटी दिले असते तरी मी गद्दारी केली नसती असंही ते म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. मला ऑफर होती मात्र मी गद्दारी केल नाही असंही ते म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या