Advertisement

Responsive Advertisement

हारतूरे सत्कार संपला असेल तर नव्या पोलीस निरीक्षकांकडून गुटखा,मटका,अवैद्य दारू,रोडरोमिओ,चोरट्यांच्या बंदोबस्ताची अपेक्षा

- महाविद्यालय,खाजगी शिकवणी वर्ग,बसस्थानक,हुतात्मा स्मारक परिसरातरोड रोमियोंचा सुळसुळाट

ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 
                 येथील पोलिस स्टेशनला (Jintur police staion)नव्याने आलेले पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या स्वागताला राजकीय, सामाजिक,पञकारिता क्षेत्रातील दिग्गजांची रांग लागली असली असून त्यांच्याकडून शहरात भयमुक्त वातावरणाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
           परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका राजकीय,प्रशासकीय तसेच सामाजिक पटलावर अत्यंत महत्त्वाचा तालुका समजला जातो.मागील काही काळापासून जिंतूर तालुक्यात राजकीय क्षेत्रातील वाद-विवाद तसेच तालुक्यात वाढलेला चोरीच्या घटना,अवैद्य धंद्याचा बाजार, शेजारील जिल्ह्यातून होणारी मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी, वाळू माफिया यासारख्या नियमबाह्य धंद्यामुळे जिंतूर तालुका एका वेगळ्याच नावारूपाला येत आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी कार्यरत असलेल्या अनेक पोलीस निरीक्षकांना अधिकाऱ्यांना याचा झटका सोसावा लागला यामध्ये मात्र अवैद्य व्यवसाय करणारे, राजकीय वाद पेटविणारे नामनिराळे राहिले त्या अवैद्य व्यवसायिकांच्या नादाला लागून आर्थिक मोह-माया गोळा करण्याच्या नादात या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यांना सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य सोडून दिले.परिणामी त्यांच्यावरील कारवाईमुळे तालुक्याला देखील बदनामीला सामोरे जावे लागले. तालुक्यातील वाळू माफिया, अवैद्य दारू विक्रेत्यांशी पोलिसांचे अर्थिक हितसंबंध असल्याचे या अगोदरही उघडकीस आल्यामुळे पोलीस प्रशासनाला नामुष्कीला सामोरे जावे लागले तर यामुळे जिंतूर तालुक्याचे नाव हि फार धुळीस मिळाले. असे असताना आता नव्याने आलेले पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या समोर शहरातील सद्यपरिस्थितीत गुटखा माफिया,महाविद्यालय खाजगी शिकवणी वर्ग या ठिकाणी रोडरोमिओ, मुख्य बाजारपेठ या ठिकाणी चोरटे तसेच रात्रीला होणारी बेकायदेशीर वाळू माफियांची वाहतूक या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक दंतुलवार यांनी तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे सूतोवाच केले असले तरी पोलिसांची कामगिरी जिंतूरकरांसाठी कौतुकास्पद असली तरी सध्या त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांनी होत असलेल्या चोऱ्या, बाजारपेठेत खरेदी साठी जाणाऱ्या महिला महाविद्यालय तरुणी यांना रोडरोमिओ कडून होणारा त्रास, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,मुख्य बाजारपेठ या ठिकाणी होणारी नियमित वाहतूक कोंडी, यासारख्या गोष्टींचा बंदोबस्त करताना भयमुक्त वातावरणाबरोबर अवैद्य व्यवसाय नियंत्रणाची अपेक्षा देखील केली जात आहे.
         तालुक्याबाहेर आंदोलकांनी तालुक्यात आंदोलन करण्याबाबत देखील सर्वपक्षीय एखादे निवेदन दिले वास्तविक पाहता एखादी घटना घडल्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये याची देखील जबाबदारी पोलिस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आंदोलकांना देखील संधी मिळणार नाही.याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या तोकडी असली कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत केलेल्या कामाप्रमाणे त्यांच्याकडून देखील कमी कर्मचाऱ्यावर चांगले काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ते निश्चितपणे काम पूर्ण करतील अशी अपेक्षा तालुकावासीयातून व्यक्त केली जात असली तरी अनेक राजकीय हस्तकांना मात्र त्यांना अंतरावरच ठेवावे अशी मागणी यानिमित्तानं पुढे येत आहे. तालुक्यांमध्ये विविध खात्यातील अनेक अधिकाय्रांनी उल्लेखनीय काम करून जाताना व येताना त्यांच्या कार्याबद्दल कमी सत्कार केल्याचे दिसून आले मात्र पोलीस खात्याचे अधिकाऱ्याला मात्र वर्दळ जास्त दिसून येते याची देखील या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या